उद्या शिव पादुकांचे समाधी मठात आगमन : किल्ले शिवनेरीहून प्रस्थान
निपाणी (वार्ता) : पंढरपुराच्या आषाढीवारी साठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादुका सोहळ्याचे किल्ले शिवनेरीहून प्रस्थान झाले आहे. या सोहळ्याचे हे 8 वर्ष आहे. निपाणी या ऐतिहासिक नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दिव्य पादुकांचे श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाचे मठाधीश प्राणालिंग स्वामींच्या प्रयत्नाने शुक्रवारी (ता.15) शिव भक्ताना शिवरायांच्या पादुकांच्या दर्शनाचे भाग्य मिळणार आहे.
पालखी सोहळाचे समन्वयक डॉ. संदीप माहिद-गुरुजी यांच्यासह मान्यवर शिवभक्तासाठी नियोजन करीत आहेत. प्राणालिंग स्वामी, कार्यकर्ते, मावळा ग्रुप, शिवभक्त एकदिवशीय गडकोट मोहिमाचे नियोजन निपाणीत करीत आहेत. शिवछत्रपतीचा पादुकावर पवमान अभिषेक व रुद्रअभिषेक झाल्यावर शिवाई देवीची महापूजा बांधून, महादोर पूजन करून हा पालखी सोहळा रायगडकडे मार्गस्थ झाला.
किल्ले शिवनेरीहून निघालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादुका मंचर, खेड पुणे मार्गे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मभूमीत सासावड परिसरात विसावा घेऊन पुढे जातील. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाचे नियम पाळत शिवरायांचा पालखी सोहळा रायगडहून पायीच पंढरपूरला विठुरायचा भेटीस गेला होता. आषाढीवारीस निघालेल्या शिवरायांचा पादुका दरवर्षी शिवनेरी, संग्रामदुर्ग, मल्हाडगड, पुरंदर, रायरेश्वर असा प्रवास करून रायगडाला जातात.
आषाढवारी पूर्ण झाल्यानंतर पुढील 11 महिन्याचा कायम वास्तवव्यासाठी या पादुका शिवजन्म भूमीत या कायम परत येणार आहेत.
शुक्रवार (ता.15) सरसेनापाती प्रतापराव गुजर यांनी लढवलेली नेसरीची खिंड इथून निपाणी नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पादुका येणार आहेत. येथे पादुकाचे औक्षण होऊन विरुपाक्षलिंग समाधी मठ येथे या पादुका दर्शनासाठी खुल्या राहतील, अशी माहिती सागर श्रीखंडे यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta