हभप राजू सुतार यांची कीर्तन : कोगनोळीत गुरुपौर्णिमा साजरी
कोगनोळी : मानवी जीवनामध्ये गुरुचे असाधारण महत्व आहे. जीवनात गुरुची भेट होणे महत्त्वाचे आहे. गुरु भेट झाल्याशिवाय जन्म सफल होत नाही, असे मनोगत हभप राजू सुतार महाराज सांगाव यांनी व्यक्त केले.
कोगनोळी तालुका निपाणी येथे मुरलीधर मंडपात आयोजित गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमात ते कीर्तन करताना बोलत होते.
मुरलीधर मंडपात विधीवत पूजा व अभिषेक करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली.
बाबासाहेब वडर व मान्यवरांच्या हस्ते गुरुवर्य पांडुरंग काजवे महाराजांच्या पायाचे पूजन करण्यात आले.
यावेळी विणेकरी रामचंद्र डोंगळे, मृदंगसाथ सुनील कडतारे, गायन साथ श्याम पाटील, तानाजी पाटील, मुकुंद वठारे यांनी केले.
यावेळी पंडित पाटील, उद्धव काजवे, मऱ्याप्पा पाटील, हरी आंबी, संभाजी पाटील, दीपक पाटील, निवृत्ती सुतार, प्रशांत नवाळे, उदय मोनाप, सयाजी गायकवाड, प्रकाश कदम, बाळासाहेब वठारे, यशवंत जाधव, दादासाहेब माणगावे, दगडू नागराळे, तात्यासाहेब निकम, किरण जाधव, पांडुरंग पाटील, उदय मगदूम, पांडुरंग आंबी, माया पाटील, प्रीती वठारे, शुभांगी सुतार, सुलाबाई सुतार, कृष्णाबाई माळी यांच्यासह अन्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta