कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर बसच्या धडकेत पदचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार तारीख 15 रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
भानुदास श्रीपती विटे (वय 55) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, भानुदास विटे हे करनूर येथून कोगनोळी कडे येत होते. राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी फाट्यावर राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना निपाणी कडून कोल्हापूरकडे जात असलेल्या कर्नाटक महामंडळ बस क्रमांक केए 25 एफ 3434 या बसची भानुदास यांना जोराची धडक बसली. भानुदास यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला होता. जखमी भानुदास यांना खाजगी वाहनाने कागल येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी कोगनोळी पोलीस स्टेशनचे बीट हवालदार राजू गोरखनावर, शिवप्रसाद कावडण्णावर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून अपघातग्रस्त बस बाजूला करून वाहतूक सुरळीत करून दिली.
Belgaum Varta Belgaum Varta