कोगनोळी : विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावरून तार तुटून खाली पडली होती. या पडलेल्या तारेला तीन शेळींचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार तारीख 15 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून अधिक माहिती अशी की, येथील हंचिनाळ रोडवर असणाऱ्या पीरमाळ येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावरून तार तुटून खाली पडली होती. रोजच्याप्रमाणे येथील मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्यांना घेऊन चाऱ्याच्या शोधात निघाले होते. विद्युत तार तुटून खाली पडल्याचे दिसत नसल्याने या तारेचा स्पर्श होऊन सूर्याप्पा बापू गोरडे यांच्या तीन शेळ्या जागीच ठार झाल्या. तर तडपडणाऱ्या शेळ्या बघून इतर शेळ्या बाजूला पळून गेल्या. मेंढपाळ विठ्ठल गोरडे यातून सुदैवाने बचाव झाला.
या घटनेमध्ये सूर्याप्पा गोरडे यांचे सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी विद्युत बोर्डाचे कर्मचारी संजय खुरपे, अभिषेक सौंदत्ती, रामा कोळेकर राज कोळेकर अनिल कोळेकर, विठ्ठल कोळेकर यांनी भेट दिली.
Belgaum Varta Belgaum Varta