प्रशांत नाईक : राजेश क्षीरसागर यांची भेट
निपाणी (वार्ता) : शिवसेनेचे नुतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आणि राज्य नियोजन मंडळाचे मंत्री राजेश क्षीरसागर यांच्या शिवालय या कोल्हापूरमधील बुधवारपेठेतील कार्यालयातील निपाणी येथील शिष्टमंडळाने भेट देऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी निपाणीतील शिष्टमंडळातील प्रशांत नाईक आणि नवनाथ चव्हाण यांनी नूतन सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाभागात लक्ष देऊन तात्काळ सीमाप्रश्न सोडवावा. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीतील त्रुटी दूर करण्यासह या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घालून देण्याची मागणी मुंबईमधून कोल्हापूरला आलेल्या शिष्टमंडळाकडे केली आहे.
आमदार राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर येथील असल्याने त्यांना सीमाभागाबद्दलची सर्व माहिती आहे. त्यामुळे त्यांची सीमाभाग समन्वय मंत्री म्हणून निवड करावी. मुळातच मराठी भाषेत असलेल्या 865 गावांमधील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे भवितव्य अंधकारमय बनत आहे. वरील सर्वच गावातील विद्यार्थ्यांना विविध सवलतीसह त्यांना शिक्षणामध्ये आरक्षण उपलब्ध करावे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी यापूर्वी महाराष्ट्रातील सर्व सरकारने प्रयत्न केले आहेत. आता महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपचे सरकार असून केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून सीमाप्रश्नाचा तोडगा तात्काळ काढण्याची मागणीही या शिष्टमंडळाने केली.
राजेश क्षीरसागर यांनी आपण नेहमीच सीमाबांधवासोबत आसल्याचे सांगून लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याची ग्वाही दिली.
यावेळी नवनाथ चव्हाण, सुनील हिरुगडे, उत्तम कामते, अरुण आवळेकर, अतुल चावरेकर, विजय कामते, रुपेश तोडकर, शिवम जासुद अनुराग पटील, ओमकार केसरकर, अश्रफ मुल्ला, जीवन कोरे, राहुल माने, किरण पाटील यांच्यासह सीमाबांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta