Wednesday , December 10 2025
Breaking News

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी गुरुवारी विधान सौधवर मोर्चा

Spread the love

 

राजू पोवार : शेतकरी मेळाव्याचेही आयोजन
निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बेळगाव येथील विधानसभा गुरुवारी (ता.२१) मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर मेळावा होणार आहे. त्यामध्ये रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी केले आहे. येथील शासकीय विश्राम धामात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, ढोणेवाडी शाळेत अनुष्का भेंडे हिला शॉक लागून मयत झाल्याने 50 लाख आर्थिक मदत त्यांच्या कुटूंबाला मिळालीच पाहिजे. दुधगंगा वेदगंगा आणि पंचगंगा नदीकाठावर 2019, 2020 आणि 2021 महापूरामुळे नुकसान होऊन सर्वे चुकीचा झाला आहे. त्या नुकसानग्रस्तांना न्याय मिळावा. चिकोडी जिल्ह्यातील कारदगा नदीवर धरण बांधताना दोन्ही बाजूला कमानी करावी. शेतकऱ्यांचा लॉकडाऊन काळात घरफाळा पाणीपट्टी व वीज बिल माफ करावे. शेतकऱ्यांना 24 तास पंपसेट वीज मिळाली पाहिजे. शेतक-यांच्या पिकावर उत्पादन खर्चावर योग्य हमी भाव मिळावा. उसाला एक रक्कमी भाव 5 हजार प्रतीटनाला मिळाला पाहिजे. साखर कारखान्याच्या प्रत्येक सभासदाला शंभर किलो साखर मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी झाली पाहिजे.
शेतकयांच्या मुलांना शाळेत प्रवेशासाठीविशेष आरक्षण दिले पाहिजे. लॉकडॉऊनच्या काळामध्ये मार्केट ओपन नसल्यामुळे शेतकरांचा भाजीपाला नुकसान झाल्यामुळे एकरी 25 हजार नुकसान भरपाई मिळावी. रयत ‘ संपर्क केंद्रामध्ये शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा निपक्षपाती मिळाव्यात. काही अधिकारी शेतकऱ्यांबरोबर गैरवापर करतात. ती थांबवावी. हेस्कॉमच्या गलथानपणामुळे जे काही ऊसाचे क्षेत्र जळीत झाले आहे. अशा शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासह विविध मागण्यासाठी गुरुवारी या मेळाव्याचे आयोजन केल्याचे केले आहे. निपाणी तालुक्यातील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी आठ वाजता अकोळ रोडवर एकत्रित जमण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी संघटनेचे शहराध्यक्ष उमेश भारमल, रमेश पाटील, सर्जेराव हेगडे, बाळकृष्ण पाटील, बबन जामदार, कलगोंडा कोटगे, बाळासाहेब हादीकर, बाबासाहेब पाटील, भगवंत गायकवाड, अनंत पाटील, शरद भोसले, चिनू कुळव मोडे, नामदेव साळुंखे, संजय जोमा, शिवगोंडा पाटील, सुरेश घाटवडे, राजाराम पाटील, संजय नाईक, विवेक जनवाडे, मलगोंडा मिरजे, शिवाजी वाडेकर, अनिकेत खोत यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत शस्त्रधारी चोरट्यांकडून धाडसी घरफोडीचा प्रयत्न

Spread the love  चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद : चोरटे धावले पोलिसांच्या अंगावर निपाणी-(वार्ता) : शहरासह उपनगरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *