युवा नेते उत्तम पाटील यांनी वाहिला दिंडीचा भार
कोगनोळी : हणबरवाडी (तालुका निपाणी) येथील हनुमान भजनी मंडळ व वारकरी भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिरामध्ये गोपाळकाला भक्तीमय वातावरणात पार पडला. टाळ-मृदंगाच्या गजरात व ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात गावातून सवाद्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी युवा नेते उत्तम पाटील यांनी दिंडीचा भार वाहिला. आणि वारकरी दिंडीमध्ये सहभागी होऊन भक्तीचा ठेका धरला. गावातून दिंडी फिरुन आल्यावर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला. याचा आनंद अबालवृद्धासह भाविकांनी घेतला.
यावेळी कोगनोळी श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन खोत, प्रजावाणी फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मुरारी-कोळेकर, दिंडीचालक मुरलीधर कोळेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड, जयकिसान पीकेपीएस संघाचे उपाध्यक्ष प्रविण पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीपती गोरडे, रघुनाथ शिंदे, अनिल पोवाडे, महादेव खोत, रामदास कोळी, तात्यासाहेब खोत, सदाशिव कागले, नामदेव खोत, विष्णू शिंदे, बाळासो खोत, सुनिल घुगरे, बंडा पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta