निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या निपाणी तालुका महिला शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्यदलित संघर्ष समितीचे राज्य संचालक परशुराम निलनायक होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते निपाणी नगरपालिका आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मुन्सिपल हायस्कूल मैदानावर क्रांती स्तंभ आवारामध्ये उपस्थित मान्यवर व दलित बांधव व महिला वर्गांनी बौद्ध वंदना करून अभिवादन केले.
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आंबेडकर भवन येथे निपाणी तालुका दलित संघर्ष समिती महिला शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित महिलांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. त्यानंतर या शाखेचे कार्यकारीनी घोषित करण्यात आली.
कार्यक्रमास संजीव कांबळे, रवी बस्तावडे, चिकोडी महिला जिल्हा संचालिक सविता असुदे, सिद्धार्थ शिंगे, निपाणी तालुका महिला विभाग संचालिक दिपाली माळकरी, उपसंचालिक संध्या माळकरी, खजिनदार संगीता बनसोडे, वैशाली कांबळे, अलका सावळा, सह्याद्री माळकरी, राजश्री गस्ते, चिकोडी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जावीर काजी, रोहित सावळा, अजय सावळा, ऋषिकेश घस्ते, महेश कांबळे, शशिकांत कांबळे यांच्यासह भीम नगर, बौद्ध नगर, सिद्धार्थ नगर मधील दलित बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta