Wednesday , March 4 2026
Breaking News

बेनाडी भाग्यलक्ष्मी सौहार्द संस्थेतर्फे सत्कार समारंभ

Spread the love

 

बेनाडी (वार्ता) : येथील भाग्यलक्ष्मी सौहार्द संस्थेतर्फे निवडीनिमित्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शंकर जनवाडे उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे सचिव विजय वाडकर यांनी स्वागत केले. त्यानंतर संचालक एम. बी. जनवाडे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेचे संचालक आणि बेनाडी येथील रहिवाशी संजय तावदारे यांची सांगली येथील लठ्ठे शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालकपदी निवड झाली आहे. शिवाय बेनाडी येथील रहिवासी आणि दैनिक सकाळ निपाणी कार्यालयातील बातमीदार राजेंद्र हजारे यांना कोल्हापूर येथील युवा पत्रकार संघाचा विशेष पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल दोघांचाही संस्थेचे अध्यक्ष शंकर जनवाडे व सुरज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी तावदारे आणि हजारे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास संचालक रविंद्र जनवाडे, जोतिराम जववाडे, राजेंद्र चौगुले, मधुकर जाधव, संजय पार्वते, राजु क्षीरसागर, सदानंद माळी, निर्मला जनवाडे, सुरेश वराळे, भिमा मस्ताने यांच्यासह संचालक व कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *