सुब्रमण्यम के. : ‘महात्मा बसवेश्वर’मध्ये कार्यशाळा
निपाणी (वार्ता) : कोरोना महामारीच्या काळामध्ये मानव जातीचे जीवन किती क्षणभंगुर आहे, याची प्रचिती आली. पण मानवाला संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी अनेक प्रकारचे श्रम करून उपजीविकेचे साधन निर्माण करावे लागते. त्यातून राहिलेली आर्थिक पुंजी एका विश्वासार्ह सरकारी किंवा खाजगी संस्थेकडे ठेवून निर्धास्त राहण्याचा प्रयत्न करत असतात. या प्रक्रिये नंतरच सहकारी सौहार्दची नेमकी भूमिका चालू होते, असे मत सुब्रमण्यम के. यांनी व्यक्त केले. येथील महात्मा बसवेश्वर सौहार्द संस्थेतर्फे आयोजित कार्यशाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
प्रारंभी सुब्रमण्यम के., संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. आर. पाटील, उपाध्यक्ष किशोर बाली, संचालक महेश बागेवाडी, संचालक दिनेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलन झाले.
सुब्रमण्यम के. म्हणाले, संस्थेचा आर्थिक लेखाजोखा पाहिल्यास संचालक मंडळ सचोटीने ग्राहकांशी जोडलेले आहे. हीच नाळ घट्ट करण्याचे शिवधनुष्य उचलून रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करून ५०० कोटीकडे यशस्वी वाटचाल व्हावी.
संस्थेचे स्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमास संचालक प्रताप, पट्टणशेट्टी, श्रीकांत परमणे, सुरेश शेट्ट, महेश बागेवाडी, डॉ. बसवराज कोठिवाले, अशोक लिगाडे, सदानंद दुमाले, प्रताप मेत्राणी, पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सदाशिव धनगर, यांच्यासह सर्व शाखेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कर्मचारी उपस्थित होते. सुजाता जाधव यांनी स्वागत केले. सुरज घोडके यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta