मान्यवरांची उपस्थिती : महाप्रसादाने यात्रेची सांगता
निपाणी (वार्ता) : श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांनी स्थापन केलेल्या श्री सटवाई मंदिरामध्ये त्रिवार्षिक यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंत्री शशिकला जोल्ले यांच्यासह नगराध्यक्ष जयवंत भाटले व नगरसेवक उपस्थित होते. महाप्रसादाने यात्रेची सांगता करण्यात आली.
निपाणी व परिसरातील बालगोपाळांचे तब्येत सुदृढ व चांगली राहावी, यासाठी प्रत्येक माता ही पाचव्या दिवशी सटवाई देवीची पूजा करते. म्हणूनच श्रीमंत सिद्धूजी राजे निपाणकर यांनी सटवाई देवीचे मंदिर उभे केले आहे. या मंदिराचे अनेक वैशिष्ट्य या मंदिरामध्ये तुळजा मूर्तीमध्ये दडले आहे. यात्रेनिमित्त सकाळी सटवाई रोड येथील समस्त भगिनी मंडळ गावातील प्रमुख मार्गावरून शेकडोच्या संख्येने पाण्याच्या कळशा सजवून प्रमुख मार्गावरून वाजत गाजत सटवाई मंदिर येथे आणण्यात आले. त्यानंतर निपाणकर घराण्याची वंशज श्रीमंत दादाराजे व श्रीमंत सम्राजलक्ष्मी राजे निपाणकर यांचे सर्व सटवाई रोड वासीयांनी स्वागत केले. निपाणकर सरकार दाम्पत्य चे हस्ते देवीची विधी पूर्वक अभिषेक घालण्यात आला. अभिषेक झाल्यानंतर समस्त जमलेल्या देवीत सटवायची महाआरती करण्यात आली. प्रसाद दाखवण्यात आला. त्यानंतर मंत्री शशिकला जोल्ले यांचे आगमन झाले यांचा देखील श्रीमंत सम्राज लक्ष्मीराजे निपाकर यांनी ओटी भरून सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीमंत विजयराजे निपाणकर, मंत्री शशिकला जोल्ले, नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती राजू गुंदेशा, यांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे पूजन करण्यात आले. माजी आमदार काकासाहेब पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांनी देखील देवीचे दर्शन घेतले. त्यांचा सत्कार श्रीमंत विजयराजे निपाणकर यांच्या हस्ते झाला.
यावेळी शिरीष कमते, इम्रान मकानदार, संजय सांगावकर, नरेंद्र बाडकर, प्रसाद बुरुड, रुपेश शाह, भालचंद्र आजरेकर, संजय चव्हाण, प्रकाश जाधव, युवराज खांडेकर, कृशान्त माने, अनिकेत बुरुड, केतन सावंत यांच्यासह भाविक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta