प्रकल्प संचालक श्रीकांत पोतदार यांची उपस्थिती : कोगनोळी फाट्याला भेट
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चे रुंदीकरण होणार असून कोगनोळी फाट्यावर उड्डाणपूल होणार आहे. यामुळे येथील शेतकर्यांची जमीन या प्रकल्पामध्ये जाणार आहे. येथील शेतकर्यांचे नुकसान होणार आहे. शेतकर्यांनी टोल नाका शेजारी असणारी गायरान जमीन दाखवली आहे. यासर्व गोष्टीची माहिती वरिष्ठ अधिकारी यांना कळवून कोगनोळी येथील शेतकर्यांना योग्य न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी रविंद्र कर्लिंगन्नावर यांनी केले.
यावेळी प्रकल्प संचालक श्रीकांत पोतदार उपस्थित होते.
कोगनोळी तालुका निपाणी येथील राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण व फाट्यावर होणार्या उड्डाणपूल जागेची पाहणी सोमवार तारीख 27 रोजी केली यावेळी बोलत होते.
यावेळी टोलनाका, कोगनोळी फाटा, दूधगंगा नदी परिसर, पूरग्रस्त कॉलनी लगत असणार्या गायरान विभागाला भेट देऊन या ठिकाणी होणार असलेल्या प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी उपस्थित शेतकरी बाळासाहेब हदीकर व संदीप चौगुले यांनी प्रकल्पामुळे शेतकर्यांचे होणारे नुकसान उपस्थित अधिकारी वर्ग यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सर्वेअर कलमेश गुडीमनी, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एम. टोलगी, संजय काडगौडर, पोलीस अमर चंदनशिव, राजू गोरखनावर, एस. एम. गाडीवड्डर यांच्यासह अन्य पोलिस उपस्थित होते.
यावेळी अनंत पाटील, पुंडलिक माळी, उमेश परीट, नागेश पाटील, अरुण पाटील, गब्बर शिरगुप्पे, सचिन चौगुले, अजित चौगुले, विजय सावजी, मुनीर मुल्ला, तानाजी जाधव, संतोष चौगुले, सदाशिव इंगवले, महादेव इंगवले, राजू पाटील, युवराज माने यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व्यवसायिक ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
केंद्राने सीमाप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती करणारा ठराव संमत
Spread the love मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल निपाणीत आनंदोत्सव निपाणी : मराठी भाषेला …