निपाणी : केंद्र सरकारने शेतकर्यासाठी केलेल्या कायद्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरोधात 10 महिन्यापासून दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. तरीही त्याची केंद्र सरकारने दखल न घेतल्याने सोमवारी (ता.27) भारत बंदची हाक शेतकरी संघटनेने दिली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे निपाणी तालुका बंद ठेवण्यात आला. आक्रमक झालेल्या झालेल्या शेतकर्यांनी सोमवारी (ता.27) चिकोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली संगोळी रायण्णा सर्कलपासून मोर्चा काढून धर्मवीर संभाजी चौकात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांना निवेदन दिले.
राजू पोवार म्हणाले, केंद्र सरकारने शेत जमीन विक्रीबाबत नवीन 3 कायदे केले आहेत. हे कायदा शेतकर्यांना जाचक ठरत असून भविष्यात शेतकरी भूमिहीन होणार आहे. याबाबत नवी दिल्ली येथे शेतकर्यांचे आंदोलन सुरू असून याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याशिवाय शेतमालाला हमी भाव मिळत असल्याने शेतकरी वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत लोटत जात आहेत. कोरोना काळात शेतीमालाला दर न मिळाल्याने भाजीपाला पिके रस्त्यावर फेकून द्यावी लागली आहेत. या शिवाय महापूर काळातही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही. याउलट शेतकर्यांचे वीज बिल माफ न करता त्याची वसुली केली जात आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण याला शेतकर्यांचा विरोध नसून परिसरातील जमीन उद्योगधंद्यासाठी देऊन शेतकर्यांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे महामार्ग रुंदीकरण व्यतिरिक्त कोगनोळी परिसरातील एक इंचही जमीन देणार नाही. शेतकर्यांच्या विरोधात जाऊन जमीन संपादन केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राजू पोवार यांनी दिला.
निपाणी तालुका अध्यक्ष प्रा. आय. एन. बेग यांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. शिवाय त्याचे मंडळी शेतकर्यांचा वापर केवळ मतदानासाठी करत असून त्यांच्या हिताच्या दृष्टीने कोणतेच पाऊल उचलले नाही. कायदे रद्द न केल्यास यापुढील काळातही उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. तहसीलदार डॉ. भस्मे यांनी निवेदन स्वीकारून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. दरम्यान निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार येत नसल्याने तब्बल तासभर मानवी साखळी करून शेतकर्यांनी ठिय्या मारला. त्यामुळे तहसीलदारांना यावे लागले.
यावेळी उमेश भारमल, रमेश पाटील, नारायण पाटील, संदीप चौगुले, उमेश परीट, बाळासाहेब हादीकर, अनंत पाटील, राजू पाटील, अल्लाउद्दीन शिरगुप्पे, विजय सावजी, कलगोंडा कोटगे, मलगोंडा मिरजे, सुभाष देवर्षी, युवराज जाधव, पुंडलिक माळी, संतोष सोलापूरे, संतोष देसाई यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
Check Also
लिंगायत आरक्षणासाठी २२ रोजी अधिवेशन
Spread the love बसव मृत्युंजय स्वामी; वकील संघटना करणार नेतृत्व निपाणी (वार्ता) : लिंगायत समाजाला …