पंकज पाटील : हायस्कूल येथे अंडी, केळी वितरण
कोगनोळी : माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हायस्कूल येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चेअरमन प्रीतम पाटील व संचालक मंडळ यांच्यासह कर्मचारी सदैव प्रयत्नशील आहेत. शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजना विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे मनोगत माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी व्यक्त केले.
कोगनोळी तालुका निपाणी येथील वीरकुमार पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल येथे अंडी व केळी वितरण शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी तालुका पंचायत सदस्य व संस्थेचे चेअरमन प्रीतम पाटील हे होते.
मुख्याध्यापक एस. एन. अलगुरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना केळी व अंडी वितरण केली.
यावेळी ए. पी. कुलकर्णी, आर. आर. कुराडे, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ग्राम पंचायत उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील, तात्यासाहेब कागले, दिलीप पाटील, कृष्णात भोजे, कृष्णात खोत, धनंजय पाटील, आप्पासो खोत, महेश जाधव, बुद्धीराज घस्ते, तुकाराम पाटील यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta