Saturday , October 19 2024
Breaking News

वृक्षारोपणाचा ध्यास, सरसावले शेकडो हात!

Spread the love

अर्जुनी येथे नृसिंह देवराईसाठी वृक्षारोपण : निपाणीतील ‘सृष्टी’ संघटनेचा पुढाकार
निपाणी (वार्ता) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सर्वत्र पर्यावरण संवर्धनाचा जागर घालत वृक्षारोपणासाठी अनेक हात सरसावले आहेत. दरम्यान (अर्जुनी ता. कागल) येथील टेकडीवर नृसिंह देवराई साठी वृक्षारोपण करण्याचा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला. त्यानुसार देवचंद महाविद्यालया तील छात्रसेना, ग्रामस्थ, सयाजी शिंदे यांची सहयाद्री देवराई, फिरोज यांच्या सहकाऱ्यांनी वृक्षारोपणासाठी शेकडो हात पुढे आले. अर्जुनीतील ‘नृसिंह देवराई’ भविष्यात कोल्हापूर जिल्यात दिशादर्शी प्रकल्प म्हणून असे आदर्शवत असेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यासाठी निपाणी केली फिरोज चाऊस व त्यांच्या सहकारी वर्गाच्या ‘सृष्टी’ पर्यावरणवादी संघटनेने पुढाकार घेतला.
फिरोज चाऊस यांची सृष्टी पर्यावरणवादी संघटना आणि ग्रामपंचायत अर्जुनी यांच्या संयुक्त विद्यमाने नृसिंह देवराई निर्मितीसाठी सर्वसाधारणपणे ८ते १० फुट उंचीची असणारी रोपे वृक्षारोपणासाठी लावण्यात आली. अर्जुन नगर येथील देवचंद महाविद्यालयातील एनएसएस, एनसीसी व व्हाईट आर्मीचे शंभराहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थीनी वृक्षारोपणासाठी प्रत्यक्ष काम करुन महत्वाचे योगदान दिले. परिसरात प्रथमच ८ ते१० फूट उंचीची विविध प्रकारची रोपे अर्जुनी येथे लावण्यात आली.
कागल येथील गटशिक्षणाधिकारी सुशील संसारे यांनी, दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. त्याला आपण सर्वजण जबाबदार आहोत. शिवाय ऑक्सिजनची कमतरता भासत असूनही आपण वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष करीत आहोत.भविष्यात ऑक्सिजन मिळण्यासह पर्यावरणाचा समतोल टाळण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. नृसिंह देवराई ही भविष्यात सर्वांसाठी आदर्शवत ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. सह्याद्री देवराईचे तांत्रिक सल्लागार सुहास वायंगणकर यांनीही देवराईचे महत्व पटवून दिले.
उपसरपंच सुनील देसाई यांच्या हस्ते सुशील संसारे यांचा सत्कार करण्यात आला. वड, पिंपळ, चिंच, बहावा, आंबा, जांभूळ, महोगनी, सिताफळ रामफळ, कैलासपती, पण अशी २७ प्रकारची रोपे मोफत वितरण केलेबद्दल फिरोज चाऊस यांचा सत्कार गट विकासाधिकारी सुशील संसारे व समीरा फिरोज चाऊस यांचा सत्कार सरपंचवर्षा सुतार यांचे हस्ते करण्यात आला. देवचंद महाविद्यालयातील मेजर प्रा. डॉ. अशोक डोनर, प्रा. शिवाजी मोरे, शिवानंद चौगुले, प्रा. डॉ. राहूल घट्टेकरी, डॉ. राजेश बनवान्ना, निपाणी नगरपालिका पर्यावरण अभियंता, चंद्रकांत गुडनावर, अर्चना पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सुदाम देसाई, महादेव पेडणेकर, रंजना कांबळे, संजीवनी चौगुले, बाजीराव चौगुले, राजन देसाई, ग्रामसेवक विजय गावडे, कृष्णात पेडणेकर सर, सूरज देसाईशंकर पाटील, कृष्णा बागडी, श्रीमती शबाना मुजावर, श्रीमती अर्चना गोरुले, महादेवी कांबळे, अनिल निकम, सुनील कांबळे उपस्थित होते.नामदेव चौगुले यांनी सूत्रसंचलन केले. प्रदीप बुधाळे पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *