परम पूज्य परमात्मराज महाराज यांचे दिव्य सानिध्य
कोगनोळी : हदनाळ (तालुका निपाणी) येथे लोकवर्गणी व श्रमदानातून नव्याने बांधण्यात आलेल्या गणेश मंदिरामध्ये श्री गणेश मूर्तीची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना श्री क्षेत्र आडी येथील परम पूज्य परमात्मराज महाराज यांच्या दिव्य सानिध्यात पार पडला.
सकाळी १० वाजता सजविलेल्या बैलगाडीतून मूर्तीची गावातील प्रमुख मार्गावरुन सवाद्य मिरवणूक काढली.
यावेळी ठिकठिकाणी रांगोळी काढून व गणेश मूर्तीवरती फुलांचा वर्षाव करुन उत्साहाने स्वागत करण्यात आले. मिरवणूक मंदिरात आल्यानंतर हळदी येथील महाराजांच्या हस्ते विधिवत पूजा व धार्मिक विधी केली.
परमात्मराज महाराज यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठापना केली.
आरती केल्यावर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष आनंदा यादव, माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी पाटील, किरण पाटील, धनाजी पाडेकर, दिलीप यादव, रंगराव शेटके, गणपती साखरे, वाय. डी. पाटील, सागर शेटके, शिवाजी कांबळे, रामचंद्र पाटील, एकनाथ डाफळे, भिकाजी काळे, भारत पाटील, संजय यादव, अक्षय पाटील, तानाजी शेटके, दिलीप काळे, सिद्धार्थ शेटके, दिनकर पाटील, नेताजी शेटके, आनंदा पाटील, नवनाथ शेटके, शिवाजी पाटील, सुरेश शेटके, शामराव किल्लेदार, गजानन शेटके यांच्यासह सह्याद्री युवा झांज पथकाचे सदस्य, गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य, महिला, भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta