तिरंग्यांची निर्मिती सुरू : ’हर घर झंडा’ उपक्रम
निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त सर्वत्र ’हर घर झंडा’ उपक्रम 11 ते 17 ऑगस्टदरम्यान राबविण्यात येत आहे. याची निपाणी तालुक्यात जय्यत तयारी सुरू आहे. तालुक्यातील सुमारे सव्वा दोन लाख घरांवर तिरंगा या कालावधीत झळकणार आहे. तिरंगा तयार करण्याचे काम खाली ग्रामोद्योगसह महिला बचतगट, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थांना देण्यात आले आहे. त्याद्वारे सुमारे 3 लाख तिरंग्यांची निर्मिती होणार आहे.
याअगोदर शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्याल, बँका, सोसायटी, ग्रामपंचायतीवरच तिरंगा फडकविला जात होता. केंद्र सरकारने ’आझादी का अमृत महोत्सवां’तर्गत ’हर घर झंडा’ उपक्रम राबविण्याचे आदेश स्थानिक पातळीवरील प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांनाहीआपल्या घरावर, इमारतीवर, अपार्टमेंटवर तिरंगा लावता येणार आहे.
काही वर्षांपूर्वी लहान प्लॅस्टिकचे ध्वज नागरिक वाहनांवर लावत होते. विद्यार्थीही मोठ्या हौसेने ते ध्वज लावत. मात्र दुसर्या दिवशी हे ध्वज कोठेही टाकलेले आढळून आल्याने. प्लॅस्टिकच्या ध्वजांवर बंदी आली. केवळ शासकीय इमारत, स्थानिक स्वराज्य संस्थांवर ध्वज लावण्यास परवानगी होती. त्यासाठीही नियम होते. सकाळी ध्वज लावून सायंकाळी अंधार होण्याच्या आत ध्वज उतरावा लागत होता. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिनी जर ध्वज उलट फडकला, उशिरा खाली उतरविला तर संबंधतांवर कारवाई होत होती.
——————————————————————————–
ध्वजसंहितेत बदल
आता केंद्र सरकारनेच ध्वजसंहितेत बदल केला आहे. दिवसा व रात्रीही तिरंगा फडकावता येणार आहे. पॉलिस्टरपासून तयार करण्यात आलेल्या, मशिनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजालाही वंदन करता येणार आहे. ’हर घर झंडा’ मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक घर व इमारतीवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रध्वज विकत घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.
——————————————————————————–
’हर घर तिरंगा’या मोहिमेमुळे तिरंगा ध्वजाची मागणी वाढली आहे. चा पार्श्वभूमीवर सर्वांनाच ध्वज उपलब्ध करून देण्यासाठी ध्वजाची मागणी केली आहे लवकरच सर्वांना ध्वज घेण्याची व्यवस्था होईल.’
– श्रीकांत पाटील, खादी ग्रामोद्योग, व्यवसायिक निपाणी
——————————————————————————–
’नागरिकांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात. देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम राहावी. त्याचे स्मरण व्हावे, या उद्देशाने देशभरात ’हर घर झंडा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. निपाणी तालुक्यात 2 लाख घरांवर तिरंगा फडकेल असे नियोजन सुरू आहे. त्याबाबत बैठकीचे नियोजनही केले जात आहे.’
– डॉ. मोहन भस्मे, तहसीलदार, निपाणी