निपाणी : सध्याचे युग हे सायन्स युग म्हणून ओळखले जाते, त्यामुळं शिक्षण घेणे हे फार सोपे झालेलं आहे, इंटरनेटच्या माध्यमात गुरफटून युवा पिढी आपल्या शाळेला विसरत आहेत. पण याला अपवाद ठरलेला आणि मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचा अजूनही मी विद्यार्थी आहे ही भावना मनात ठेऊन अमलझरीच्या यश दादासाहेब कौंदाडे या माजी विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्नाटक पब्लिक स्कूल निपाणी येथील शाळेत पेरू, सीताफळ, लिंबू, महोगणी, अशोक,/कडीपत्ता, शेवगा आशा प्रकारची रोपे शाळेत भेट म्हणून देऊन समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे, वाढदिवस म्हंटला की मौजमजा, चैनी, केक कापणे, अंडी मारणे, केक चेहऱ्याला लावणे, पार्टी या प्रकाराला आळा घालून महाविद्यालयातील मित्रांसोबत आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना मनात घेऊन अशा शाळेत आपल्याला शिकवलेल्या शिक्षक शिक्षिका यांना घेऊन ही रोपं शाळेच्या परिसरात शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनींना घेऊन लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व सामाजिक शैक्षणिक बांधिलकी जोपासली याबद्दल सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करून वाढदिवसाच्या निमित्ताने शुभाशीर्वाद दिले…
Belgaum Varta Belgaum Varta