सौंदलगा : येथील मंडल पंचायतीचे माजी सदस्य व ग्रामपंचायत नामवंत कॉन्ट्रॅक्टर, काल कथित
कै. नागोजी संतराम मेस्त्री यांचे २ जुलै २०२२ रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ नागपंचमी निमित्त, बसव पंचमी म्हणून या दिवशी दिनकर मेस्त्री, विक्रम मेस्त्री, कुमार मेस्त्री यांनी रचनावादी बालक-पालक स्कूलमध्ये पहिली ते चौथी पर्यंत विद्यार्थ्यांना दूध-बिस्किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राजू मेस्त्री यांनी केले. यानंतर सुशांत खराडे, बौद्ध उपासक कपिल कांबळे, मुख्याध्यापक अशोक गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयु.दिलीप-पिंटू माने, करण कांबळे, अक्षय मेस्त्री, आकाश मेस्त्री, मंगेश मेस्त्री, तुषार मेस्त्री, गोट्या मेस्त्री, संतोष कुर्ले, वैशाली मेस्त्री, स्वाती मेस्त्री, मधुरा मेस्त्री, अनघा कांबळे, अकबर कटके, संदीप शेवाळे तसेच मित्रपरिवाराचे सहकार्य लाभले. शेवटी आभार ओमकार मेस्त्री यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta