निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या कुन्नूर येथील शाखेचा बारावा वर्धापन दिन साजरा झाला. प्रारंभीमहात्मा बसेश्वर प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले. शाखासंचालक राजाराम पाटील यांनी स्वागत केले. शाखेचे व्यवस्थापक संजय जाधव यांनी, शाखेकडे 4 कोटी 15 लाख ठेवी, 3 कोटी 70 लाख कर्ज, 12 लाख 19 हजार निव्वळ नफा, खेळते भांडवल 4 कोटी 94 लाख, वार्षिक उलाढाल 20 कोटी 9 लाख असल्याचे सांगितले. सभासदांना उत्तम लाभांश दिला आहे. संकटकाळात सर्वसामान्यांच्या गरजा ओळखून लघु उद्योजक, शेती, वाहन कर्ज सोनेतारण कर्ज कमी व्याजाच्या अनेक कर्ज योजना सभासद नागरिकासाठी उपलब्ध करून दिले आहेत. उत्तम ग्राहक सेवा नियमितपणे देत असल्याचेही सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते नूतन शाखा अध्यक्ष व मावळत्या अध्यक्षांचा सत्कार झाला.
कार्यक्रमास मुख्य शाखेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी, अध्यक्ष एस. आर. पाटील, उपाध्यक्ष किशोर बाली, श्रीकांत परमने , सुरेश शेट्टी, प्रताप पट्टणशेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, डॉ.बसवराज कोठीवाले, सदानंद दूमाले, प्रताप मेत्रानी, सदानंद धनगर, पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, दिनेश पाटील, मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी शशिकांत आदण्णावर कुन्नूर शाखेचे नूतन अध्यक्ष किरण माने, उपाध्यक्ष राजाराम पाटील, सुनील तावदारे, सतीश चौगुले, शानुल तहसीलदार, रजनीकांत मगदूम, आप्पासो हळीजोळे, बाळासो चौगुले, बाळासो जाधव, अण्णासो चव्हाण, अण्णासो पोकळे यांच्यासह संचालक सभासद, ठेवीदार, ग्राहक, व कर्मचारी उपस्थित होते. शाखा संचालक सतीश चौगुले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta