Tuesday , March 3 2026
Breaking News

कागल बस स्थानक प्रमुखांना कोगनोळी विद्यार्थी, ग्रामस्थांचे निवेदन

Spread the love

 

कोगनोळी : येथील महाविद्यालयीन विद्यार्थीनी व ग्रामस्थांच्या वतीने कागल बस स्थानकातील प्रमुख आर. एस. ढेरे यांना कागल, सुळकुड कोगनोळी मार्गे महाराष्ट्र महामंडळाची बस सेवा सुरू करण्याबाबत निवेदन दिले.
कोगनोळीसह येथील कुंबळकट्टी, नाईक मळा, हालसिद्धनाथ नगर, पिर माळ येथील सुमारे 300 पेक्षा अधिक विद्यार्थी माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कागल व कोल्हापूरला ये-जा करत असतात.
यापूर्वी या विद्यार्थ्यांच्या साठी महाराष्ट्र महामंडळाची बस सेवा सुरू होती. महामंडळाच्या झालेल्या संपानंतर ही एस टी सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली असून वेळेवर येत नसल्याने येथील शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी ये-जा करतेवेळी चार ते पाच किलोमीटर पायी चालावे लागत आहे. तरी ही एसटी सेवा कागल – सुळकुड कोगनोळी मार्गे महाविद्यालयीन शाळेच्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्याच्या वेळेत सुरू करण्यात यावे यासाठी कोगनोळी तालुका निपाणी येथील विद्यार्थी, ग्रामस्थ व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने कागल बस स्थानकमधील प्रमुख आर. एस. ढेरे यांना निवेदन दिले.
सदर मागणीकडे आपण लक्ष घालून मागणीनुसार बस सेवा सुरू करू असे आश्वासन ढेरे यांनी दिले.
यावेळी रयत संघटना निपाणी ग्रामीण युवा अध्यक्ष बाळासाहेब हादीकर, अ‍ॅड. प्रशांत नवाळे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णात खोत, विश्वजीत लोखंडे, सचिन परीट, तानाजी नवाळे, सनी ढोबळे, सुरेश जिरगे, सागर मजगे, प्रवीण वडर, निलेश वडर, तायाप्पा वडर, महादेव कोळी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘पंचहमी’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे

Spread the love  गॅरंटी योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव ; निपाणी तालुका पातळीवरील बैठक निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *