सीमाभागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी ही राखीव जागा ठेवणेची सीमावासीयाची मागणी
निपाणी : महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक यांनी घेतलेल्या वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षेत सीमाभागातील निपाणी नगरीची सुकन्या डॉ. ऋचा राजन चिकोडे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन M.S. (Obst and Gynae) मास्टर ऑफ सर्जन प्रसुती व स्त्री रोग तज्ञ ही पदवी मिळवली. सीमाभागासाठी M.B.B.S साठी असलेल्या राखीव जागे मधुन तिने प्रथम क्रमांक पटकाविला होता. कोरोना काळात ससून हॉस्पिटलमध्ये कोरोना योध्दा म्हणून तिने रूग्ण सेवा केली होती. महाराष्ट्र शासनाने वैद्यकीय पदव्युत्तर M.D. व M.S यासाठी ही सीमाभागातील मराठी भाषिकांना राखीव जागा ठेवाव्यात, असे तिने दैनिक बेळगांव वार्ता न्युजशी बोलताना सांगितले.
आपल्या शैक्षणिक यशाचे श्रेय सर्व गुरूजनांना देऊन ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्या बाबतीत प्रबोधन करणेसाठी शिबिर आयोजित करणेचा मानस व्यक्त केला.
Belgaum Varta Belgaum Varta