कोगनोळी : सलग आठ दिवस सुरू असलेल्या पावसामुळे अनेक घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून या घरांचा सर्व्हे होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.
येथील अर्चना उत्तम कागले, आप्पासाहेब लगम्माना भोजे, सागर शिवाजी पंढरे यांच्यासह अन्य ग्रामस्थांची घरे या पावसामध्ये पडले आहेत. यामुळे अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पडझड झालेल्या घरांचा सर्वे करून ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांच्याकडून होत आहे.
गतवर्षी झालेल्या पावसामुळे पडझड झालेल्या घरांचा सर्वे करून शासनाकडून मदत मिळाली होती. यातील काही लोकांना अद्याप मदत मिळालेले नाही. व मदत मिळालेल्या काही नागरिकांच्या मध्ये दुसरा हप्ता मिळालेला नाही अशा अनेक नागरिकांनी आपली घरे बांधायला सुरू केली असून शासनाकडून निधी येत नसल्याने घरे अर्धवट स्थितीत आहेत. यासाठी शासनाने पडझड झालेल्या घरांचा सर्वे करून योग्य ती मदत नागरिकांना मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.
कोगनोळी, हणबरवाडी, दत्तवाडी परिसरात सुमारे 45 घरांची पडझड झाल्याची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात झाली आहे. या सर्व घरांचा सर्वे करून शासनाकडे पाठवून देण्यात येणार असल्याची माहिती ग्राम विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी दिली.
___________________________________________
परिसरात झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. पडझड झालेल्या घरांचा सर्वे करून मदत मिळावी
– श्री. तात्यासाहेब कागले, ग्राम पंचायत सदस्य, कोगनोळी
Belgaum Varta Belgaum Varta