निपाणी (वार्ता) : भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आजरा येथील श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीच्या येथील शाखेतर्फे निपाणी शहरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत ध्वजांचे मोफत वितरण करणेत आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. त्यानुसार उत्स्फुर्तपणे हा उपक्रम राबविण्यात आला. संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनानुसार निपाणी शाखा परिसरातील साखरवाडीतील घरोघरी जावून नागरिकांना ध्वज वितरीत करण्यात आले.
निपाणी शाखा अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. एम. हेरेकर यांच्या हस्ते ध्वज वितरण अभियानाचा प्रारंभ झाला. यावेळी निपाणी शाखा सल्लागार विरगोंडा पाटील, प्राचार्य डॉ. एम. बी. कोथळे रावसाहेब जनवाडे, वकील महेश कदम, शाखाधिकारी उत्तम दळवी, अकौंटंट के. टी. पाटील, सुनील पाटील यांच्यासह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta