
कोगनोळी : येथील वीरकुमार पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल व श्री अंबिका आदर्श विद्यालय यांच्यावतीने 75 व्या स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रध्वज जागृत फेरी काढण्यात आली.
राष्ट्रध्वज जागृत फेरी अंबिका मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, माळी गल्ली, मगदूम गल्ली, सुतार गल्ली, लोखंडे गल्ली, मुख्य बस स्टॅन्ड, मेन रोडहून अंबिका मंदिराजवळ आणून सांगता करण्यात आली.
या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान यासह अन्य घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर अनेक सुविचार लिहिलेले फलक घेतले होते. विद्यार्थी, विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान केल्या होत्या.
यावेळी मुख्याध्यापक एस एन अलगुरे, ए. पी. कुलकर्णी, आर. आर. कुराडे, वर्षा नवाळे, पद्मजा मानगावे, अमोल आवटे, ए. बी. पाटील, अंबिका आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. जी. कांबळे, एस. ए. डोंगरे, पी. एस. डोंगरे, एस. एस. निकम, शोभा आक्कोळे, एस. आर. बजयंत्री, जी. एस. कानडे, एस. एल. हजारे, आर. एम. देसाई यांच्यासह अन्य शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta