Wednesday , March 4 2026
Breaking News

सौदलगा हायस्कूलमध्ये वीर पत्नी राणी जाधव यांचा सन्मान

Spread the love

 

सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शहीद जवान प्रकाश पुंडलिक जाधव बुध्दिहाळ यांच्या वीर पत्नी श्रीमती राणी प्रकाश जाधव यांचा देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्या निमित्त व विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी चेअरमन रघुनाथ चौगुले होते. सुरुवातीला सहायक शिक्षक एस. व्ही. यादव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. एस. वाडकर यांनी प्रास्ताविकात शहीद जवानांची माहिती दिली. वीर पत्नी श्रीमती राणी प्रकाश जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यालयामार्फत राणी जाधव यांचा शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी माजी मुख्याध्यापक एस. डी. पाटील, कमिटी सदस्य आर. बी. मगदूम, अजित पाटील यांच्यासह संजय भेंडुगळे, नामदेव जनवाडे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. आर. मुधाळे यांनी केले तर आभार एम. जी. बोरगे यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *