नगरसेविका अनिता पठाडे यांचा पुढाकार : नागरिकांतून समाधान
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात आठवड्यापूर्वी झालेल्या संततधार पावसामूळे जत्रटवेस ते लखनापूर मार्गावर असलेल्या पुलावरील भराव वाहून गेला होता. त्यामुळे केसरकर, वालीकर, पाटील मळ्यामार्गे होणारी वाहतूक बंद झाली होती. ही बाब लक्षात घेऊन नगरसेविका अनिता पठाडे व येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप पठाडे यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून या पुलावर खडकाचा भराव घालून बंद झालेला रस्ता वाहतुकीस सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत असून नागरिकांतून समाधान ही व्यक्त होत आहे.
निपाणी जत्राटवेसमार्गे लखनापूर हा रस्ता परिसरातील नागरिकांना सोयीस्कर आहे. शिवाय परिसरातील विविध मळ्याकडे व शेतीवाडीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. पण गेल्या तीन-चार वर्षांपासून होणार्या पावसामुळे ओढ्याच्या जोरदार प्रवाहामूळे पुलावरील भराव दोन वर्षांत पाचवेळा वाहून गेला. वस्तीतील लोकांचा संपर्क तुटला होता. लखनापूर ओढ्यावरील मुख्य मार्गावरील पूल दूरूस्तीचे काम सुरू असल्यामूळे केसरकर, वालीकर मळ्यामार्गे वाहतूक वाढली. होती. याची दखल घेऊन वाहतूक पूर्ववत करण्यासाठी विद्यमान नगरसेविका अनिता पठाडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीनूसार मदतीचा हात दिला.
रोटरी क्लबचे अध्यक्ष माजी नगरसेवक दिलीप पठाडे यांनी रोटरी क्लबचे सहकार्य घेऊन भराव टाकण्यासाठी निलेश मातीवडर, राहूल मातीवडर यांनी जेसीबीद्वारे भराव टाकून वाहतूक सुरळीत करणेसाठी सहकार्य केले. मारूती केसरकर, काका वालीकर यांनी मुरूम टाकून सहकार्य केले. ओंकार केसरकर यांनी ट्रॅक्टरची मदत केली. विजय वरूटे, दत्ता लाटकर, प्रभाकर केसरकर यांनी परीश्रम घेतले. मळ्यातील, मल्लू पाटील वस्तीतील अनेक तरूण, महीला आणि शेतकर्यांनी लोक वर्गणी काढून सहकार्य केले. वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta