Wednesday , March 4 2026
Breaking News

कोगनोळीच्या आराध्या पाटीलला स्केटिंगसाठी बिग ब्रेन खेलरत्न क्रीडा उत्कृष्ट पुरस्कार प्रदान

Spread the love

 

कोगनोळी : येथील डॉक्टर बाळासाहेब पाटील यांची नात आराध्या पद्मराज पाटील हिला स्केटिंगमध्ये बिग ब्रेन खेलरत्न क्रीडा उत्कृष्ट पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
यामुळे तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
कोल्हापुर येथील एस के रोलर स्केटिंग अकॅडमीची खेळाडू व कोगनोळी येथील पद्मराज पाटील व श्रीदेवी पाटील यांची मुलगी आराध्या पाटील (वय 4) हिला स्केटिंग मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल बिग ब्रेन खेलरत्न क्रीडा उत्कृष्टता पुरस्कार वंडर कीड ऑन अर्थ 2022 आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सदरचा पुरस्कार बिग ब्रेन खेळ रत्न व ड्रायव्हिंग अ‍ॅस्पीरेशन डीआयएएस या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने स्पेस सर्कल सेंटर कोलकत्ता येथील भव्य कार्यक्रमात डॉक्टर प्रोफेसर प्रतीक राजन मुनगेकर, प्रेसिडेंट, वीर चक्र पुरस्कार प्राप्त माजी भारतीय नौदल अधिकारी विमल कुमार चंद्रा, डॉक्टर अर्चना बुरमन, तपन रॉय यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी पद्मराज पाटील, श्रीदेवी पाटील, डॉक्टर बाळासाहेब पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
आराध्याला प्रशिक्षक सुहास कारेकर, गोजीरा कारेकर यांच्यासह आई वडील, मोठी बहीण गुंजन पाटील, काका चेतन पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *