मान्यवरांची उपस्थिती
कोगनोळी : येथील प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी संघाची सुमारे 40 लाख रुपये खर्च करुन सुसज्ज इमारत साकारली आहे. या इमारतीच्या वास्तुशांतीनिमित्त होमहवन व पूजा असा धार्मिक विधी संस्थेचे मार्गदर्शक व माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
संस्थेचे अध्यक्ष अनिल चौगुले व वैशाली चौगुले यांच्या हस्ते होमहवन व पूजा करुन आरती केली. धार्मिक विधी व पौरोहित्य डॉ. अंकित उपाध्ये व भरत उपाध्ये यांनी केले.
यावेळी माजी जिल्हापंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, प्रियदर्शनी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा आशाराणी पाटील, माजी जिल्हापंचायत सदस्या अमृता पाटील, कोगनोळी हायस्कूलच्या संचालिका पद्मा पाटील, बीडीसीसी बँकेचे उपव्यवस्थापक कलावंत, तालुका नियंत्रक अधिकारी माळिंगे, प्रविण दावणे यांच्यासह अन्य अधिकारी, सौंदलगा शाखेचे सर्व सचिव, कोगनोळी श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन खोत, प्रियदर्शनी महिला पतसंस्थेचे मॅनेजर जगन्नाथ खोत, केशव पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष ज्ञानेश्वर डांगरे, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी, तात्यासो कागले, विश्वजीत लोखंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta