Tuesday , March 3 2026
Breaking News

‘हर घर तिरंगा’ राष्ट्रध्वजाबद्दल जागृती वाढविणारा उपक्रम

Spread the love
किरण निकाडे : कुर्लीत जनजागृती फेरी
निपाणी (वार्ता) : राष्ट्रध्वज आपल्या देशाचा अभिमान व सन्मान आहे. आपल्यासाठी धैर्याचे व प्रेरणेचे प्रतीक आहे.तो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. राष्ट्रध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी ‘आजादी का अमृत महोत्सव’ उपक्रमाअंतर्गत ‘हर घर तिरंगा ही मोहिम राबविण्यात येत आहे. यामुळे प्रत्येक भारतीयाला स्वतः च्या घरी राष्ट्रध्वज फडकविण्याची प्रेरणा मिळणार असून राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविणारा हा उपक्रम असल्याचे मत हालसिध्दनाथ कारखान्याचे संचालक किरण निकाडे यांनी व्यक्त केले. खासदार  अण्णासाहेब जोल्ले व कॅबिनेट मंत्री नामदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली जोल्ले उद्योग समूहामार्फत देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ‘आझादी का अमृतमहोत्सव’ या कार्यक्रमानिमित्त कुर्ली येथिल सिद्धेश्वर विद्यालयामध्ये ३०० विद्यार्थ्यांना तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. एस. पाटील होते. एस. एस. चौगुले यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना तिरंगा वितरण करण्यात आला. त्यानंतर विद्यालयामार्फत गावामध्ये सहवाद्य ‘आझादी का अमृत महोत्सव’ जागृती फेरी काढली. श विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणामुळे स्वातंत्र्य लढ्यातील आठवणीना उजाळा मिळाला. ग्रामस्थांनी जागृती फेरीचे स्वागत केले.
कार्यक्रमास सिताराम चौगुले, मच्छीन्द्र निकाडे, के. वाय मगदूम, उमेश निकाडे, तानाजी चौगुले, रावसाहेब शिंगाडी, शशिकांत पोवार, दादासाहेब पाटील, तानाजी मगदूम, सागर कमते, वैशाली शिंगाडी, अरुणा खंदारे, शालन यादव यांच्यासह विद्यालयाचा सेवक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘पंचहमी’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे

Spread the love  गॅरंटी योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव ; निपाणी तालुका पातळीवरील बैठक निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *