डीपी, स्टेटस, फेसबुक स्टोरीवर ‘तिरंगा’ : देशभक्तीपर गाण्यांचीही रेलचेल
निपाणी (वार्ता) : हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’, ‘ऐ वतन तेरे लिये, अशी विविध गीत आणि देशभक्तिपर भावना व्यक्त करणाऱ्या पोस्टचा समाज निपाणी परिसरातील माध्यमांवर वर्षाव पाहायला मिळत आहे. मोबाईल डीपी, स्टेटस, फेसबुक स्टोरीवर, टेलीग्राम, ट्विटर, इन्स्टाग्रामसह डिजिटल माध्यमांवर सध्या देशभक्तीमय ‘डिजिटल’ वातावरण शहरात दिसून येत आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव यंदा साजरा होत आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सध्या’हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ असे वातावरण आहे. समाज माध्यमांवर डिजिटल पोस्ट व्हायरल होत आहेत. शासनाने अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिना अगोदर दोन दिवस ध्वजवंदन करण्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. एक आठवड्यापासून सध्या देशभक्त, क्रांतिकारक यांच्या कथा व्हायरल होत आहेत. व्हॉट्सअपवर देशभक्तिपर मराठी-हिंदी गीतांचे पीडीएफ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. शहरासह जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयातून अमृत महोत्सव वर्षानिमित्त समाज माध्यमांवर जागर मांडण्यात येत आहे. एका आठवड्यापासून विविध उपक्रम, स्पर्धा आणि कार्यक्रमांनी शाळांची मैदाने गजबजली आहे. शिक्षण विभागातर्फे तीन दिवसापासून देशभक्तिपर स्पर्धांचा जागर सुरु आहे. समाज माध्यमांवर युवा वर्ग देशभक्तिपर आशय विषयाच्या पोस्ट व्हायरल करत आहेत. युवकांच्या मोबाईल स्टेटस, फेसबुक स्टोरीवर मजकूर झळकत आहे. महिला वर्ग, शाळांचे समूह, शिक्षकांचे समूहावर सध्या डिजिटल संदेश, अनेकांच्या डीपीवर, स्टेटसवर तिरंगा झळकत आहे. समाज माध्यमांवर लहानांपासून ते थोरांपर्यंत देशभक्तिपर विचार, गीते, माहिती, ऑडीओ, व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहेत.
—————————————————–
‘सोशल मिडियावर देशभक्तिपर पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्यामधून देशभक्तीच्या भावना प्रकट केल्या जात आहेत.पण माध्यम ‘डिजिटल’ आहे. सध्या बदलत्या तंत्रज्ञानाचा हा नवा आविष्कार म्हणावा लागेल.’
-विश्वनाथ जाधव, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta