
शहरात विविध उपक्रम : सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात सोमवारी विविध उपक्रमांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा झाला. त्यानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
येथील नगरपालिका कार्यालयासमोर नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण झाले. यावेळी उपनगराध्यक्षा नीता बागडे, सभापती राजू गुंदेशा, नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेजी यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.
येथील हायस्कूल समोर आयोजित कार्यक्रमात खासदार अण्णासाहेब जोल्ले, नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडे व नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार प्रवीण कारंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर त्यांनी उघड्या जीपमधून ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी पोलीस दलातर्फे मंडळ पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षिका कृष्णवेणी गर्लहोसुर यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी ध्वजाला सलामी दिली. तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी देशाला उद्देशून मनोगत व्यक्त केले. यावेळी महसूल विभागातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांसह गुणी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला.
येथील तहसीलदार कार्यालयासमोर विविध विभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत तहसीलदार प्रवीण कारंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. येथील तालुका पंचायत कार्यालयासमोर विविध खात्याच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत एम. आर. कोतवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
येथील साखरवाडी मधील काँग्रेस कार्यालयासमोर माजी आमदार काकासाहेब पाटील व आजी-माजी नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत निपाणी भाग काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
येथील आंदोलन नगर मधील तंबाखू आंदोलनातील शेतकरी हुतात्मा स्मारक, शिवाजीनगरमधील सिटू संघटनेच्या कार्यालयासमोर चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. यावेळी उमेश भारमल, भगवान गायकवाड, सर्जेराव हेगडे, हालाप्पा ढवणे व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांना व हुतात्मा शेतकर्यांना अभिवादन करण्यात आले.
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन प्रसंगी पोलीस ठाण्यासमोरील हुतात्मा स्मारक ठिकाणी उदय शिंदे यांच्या हस्ते स्मारकाचे पुजन झाले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अजित बक्कनवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये प्राचार्य स्नेहा घाटगे यांच्या उपस्थितीत अॅड. एस. ए. पाटील, बेळगाव येथील गोमटेश विद्यापीठ संचलित येथील गोमटेश स्कूल समोर करवीर रोटरी क्लबचे सदस्य दिलीप प्रधाने दिलीप शेवाळे यांच्या उपस्थितीत संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील यांच्या हस्ते, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळासमोर संस्थापक अध्यक्ष प्रा. चंद्रहास धुमाळ, संचालक विक्रमादित्य धुमाळ यांच्या उपस्थितीत ए. सी. धुमाळ, भागीरथीबाई शाह कन्या शाळेत संस्थेचे संचालक अनिलकुमार मेहता, प्रसन्नकुमार जोशी, डॉ. प्रवीणा शाह यांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष आशिषभाई शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
Belgaum Varta Belgaum Varta