Wednesday , March 4 2026
Breaking News

सौंदलगा येथे रक्तदान शिबिर संपन्न तसेच मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

Spread the love

 

सौंदलगा : श्री नृसिंह-विठ्ठल ग्रुप व श्री नृसिंह-विठ्ठल सोशल वर्क ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. त्याला तरुणांकडून व रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. येथील श्री नृसिंह-विठ्ठल ग्रुपने समाजसेवा हीच ईश्वरसेवा त्याबरोबरच “एक हात मदतीचा” हे ब्रीदवाक्य घेऊन वर्षातून एकदा रक्तदान शिबिर घेण्यास सुरुवात केली. यावेळी ही त्यांनी रक्तदान शिबिर घेतले. त्यामध्ये ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावरच न थांबता त्यांनी श्री नृसिंह-विठ्ठल सोशल वर्क ग्रुप निर्माण करून स्वखर्चाने प्रत्येक महिन्याला आरोग्य शिबिर घेतात. यावेळी ही श्री सत्यसाई सेवा समिती कोगनोळी यांच्या सहकार्यातून डॉ. केदार तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. यावेळी ही ६५ रुग्णांनी तपासणी करून घेतली. यावेळी मंडळाच्या सभासदांनी सांगितले की समाजसेवेचा वसा घेत असताना समाजाच्या उपयोगी पडावे व आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या एकाच भावनेतून समाजातील गरजू घटकांना या सेवेचा लाभ घेता यावा. ही उदात भावना उराशी बाळगून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी नामांकित व विविध रोग तज्ञ बोलावून आम्ही हे आरोग्य शिबिर घेत आहोत. यासाठी आमच्या श्री नृसिंह-विठ्ठल ग्रुप व त्यांची सहयोगी श्री नृसिंह-विठ्ठल सोशल वर्क ग्रुपचे सर्व सभासद परिश्रम घेत असतात.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *