
निपाणी : निपाणीजवळच असलेल्या अमलझरी गावात अमृतमहोत्सवी दिन व सुहास दत्ता खोत, तसेच युवा ग्रा. पं. सदस्य श्री. अभिजित शशिकांत कौंदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त गावगन्ना हातात कासरा धरून बैल पळविण्याची शर्यत झाली. शर्यतीचे उद्घाटन साईनाथ खोत यांनी केले. स्पर्धेत एकूण 10 स्पर्धक सहभागी झाले होते. प्रथम कुणाल मधुकर पाटील, द्वितीय आकाश अप्पासाहेब खोत, तृतीय किरण कृष्णा पाटील यांनी क्रमांक मिळविले. शर्यत पाहण्यासाठी गावातील आणि आजूबाजुच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास सचिन कौंदाडे, कुमार कंकणवाडे, किरण पाटील, रमेश कंकणवाडे, सतीश डाफळे, सागर खोत, गोठू खोत, महेश कदम, बचू खोत, सनी देसाई, प्रथमेश कदम, चिनू कदम, अमेय कोकरे, हर्षु बाडकर, बंडू कदम, शंकर कांबळे, पोपट खोत, विलास इंगळे, विलास कौंदाडे, सूरज पाटील, नयन रेपे व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta