निपाणी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विश्वविद्यालय नाशिक यांच्या वतीने वैद्यकीय पदव्युत्तर स्तानकांच्या दीक्षांत प्रदान समारंभात डाॅ. ऋचा मधुसूदन चिकोडे हिचा शल्यविशारद प्रसुती व स्त्री रोग तज्ञ M.S.(Obst and Gynae) ही वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर सन्माननीय पदवी जेष्ठ नेत्र तज्ञ व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण विभाग माजी संचालक पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते व पद्मविभुषण डाॅ. कांतीलाल संचेती, अधिष्ठाता डाॅ. विनायक काळे, विविध शाखेचे प्रमुख यांच्या उपस्थितीत सभारंभ पुर्वक प्रदान करण्यात आली.
कोरोनासारख्या महामारीच्या काळात कोरोना योद्धा होऊन रूग्णाची सेवा करीत खडतर असणारा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचा प्रवास ही यशस्वीपणे पुर्ण करून पदवी प्राप्त केली. त्याबद्दल डाॅ. ऋचाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta