कोगनोळी : गणेश उत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असताना कोगनोळी, हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मतिवडे, हंचिनाळ आदी परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू असल्याचे दिसून येऊ लागले आहे.
सलग दोन वर्षे कोरोना काळ असल्याकारणाने गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. यामुळे युवक मंडळांच्या मध्ये मोठी नाराजी पसरली होती. चालू वर्षी कोरोना काळ कमी असल्याकारणाने व शासनाने उत्सवावरील निर्बंध उठवले असल्याने युवकांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
परिसरातील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांची गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर मंडप घालणे यासह अन्य कामे करण्यामध्ये व्यस्त असल्याचे दिसून येऊ लागले आहे.
सध्या या विभागातील युवक गावातील मुख्य चौका चौकात आकर्षक मंडप घालणे, विद्युत रोषणाई करणे आदी कामे करत आहेत. गणेश मूर्ती आणताना मिरवणूक व निरोपाच्या वेळी मिरवणूक यावेळी बॅन्जो, झांज पथक, बँड, लेझीम मंडळ आदी वाद्य साहित्य सांगणे, देखावा तयार करणे गणेश पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करणे या कामांमध्ये व्यस्त आहेत.
येथील माळी गल्लीतील श्री गणेश युवा मंच यांच्यावतीने मंडप घालणे कामाचा शुभारंभ केला. चालू वर्षी सात फुटी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली.
यावेळी निलेश पाटील, प्रथमेश जगताप, अभिषेक भोसले, अनिल भोसले, संजू खोत, पृथ्वी भोसले, रामदास माळी, करण जाधव, भरत खोत, अनिकेत भोसले, मेघनाथ भोसले यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta