राधा कृष्णाच्या वेशभूषांनी शाळा गजबजल्या : विविध कार्यक्रमांचे आयोजन
निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात शनिवारी विविध तरुण मंडळ आणि शाळांमध्ये गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त दहीहंडीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालगोपाळांनी दहीहंडी फोडून जल्लोष साजरा केला तर राधा कृष्णाच्या वेशभूषांनी शाळांचा परिसर गजबजून गेला होता.
बेळगाव येथील गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील यांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्री प्रायमरीचे विद्यार्थी यावेळी कृष्ण आणि राधेच्या पोशाखात आले होते. प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी श्रीकृष्ण जीवनावरील लघु नाटिका सादर केली. काही विद्यार्थ्यांनी समूहनृत्य सादर केले. हायस्कूलच्या विद्यार्थिनी बरोबरच काही शिक्षीकांनीही दांडियाच्या ठेक्यावर ताल धरला. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात बांधण्यात आलेली दहीहंडी फोडून जल्लोष साजरा केला.
कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती हरदी, दिपाली जोशी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शोभा इंगळे, सन्मती पाटील, नंदिनी पाटील, सुभाष इंगळे जयपाल कुडचे, रोहित भोई यांनी परिश्रम घेतले.
कोडणी-निपाणी रोडवरील येथील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गोकुळाष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर मुलांनी श्रीकृष्ण जन्माची कथा नास्यरूपान सादर केली. देवकी – वामुदेव यांनी तुरुंगातील शिक्षा, सात आपत्यांची केलेली हत्या, श्रीकृष्णाचा जन्म व वासुदेवाने केलेले कार्य इथपर्यंतच्या घटना मुलांनी नाट्यरूपात सादर केल्या.
यानंतर दहीहंडीच्या निमित्ताने संस्थेच्या मंचालिका व प्राचार्या चेतना चौगुले यांनी कृष्णाच्या विविध गोष्टी सांगितल्या. आपली संस्कृती जपताना सर्वांनी दश व जागरूक असावे असेही सांगितले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेने शिक्षक व शिक्षिका महाजन सर निकिता ऐवाळे, भाग्यश्री शिंदे, माधुरी लोलसूरे, नाझनीन होसूरी, ज्योती चवई, पूजा कमदारे, ज्योना स्वाती पठाडे, साधना आर, शिल्पा नारळे यांनी परिश्रम घेतले. संस्थेच्या समन्वयिका अर्पिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
येथील चाटे मार्केट येथील बालगोविंदांच्या मंडळाने अत्यंत
चाटे मार्केट येथे मुख्य ठिकाणी बांधण्यात आलेली उत्साहात दहिहंडी साजरी केली. दहिहंडी बालचमूंच्या गोविंदा पथकाने अत्यंत चिकाटीने थरावर थर रचत फोडून दाखविली.
यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर तसेच प्रेक्षकांचीही हजेरी होती. पौरस भुई या बालगोविंदाने दहिहंडी फोडली.
सदर बालगोविंदांच्या पथकात सिध्दार्थ फुटाणकर, सिध्दार्थ लाटकर, अथर्व शिंदे, यश कळसकर, सागर अबरंगे, अभिराज भिसुरे, सौरभ शिंदे, कैवल्य भिसुरे, सौरभ शिंदे, उमेर बाडीवाले, उत्कर्ष रणदिवे, इरफान कोल्हापूरे, वरद शिंदे, अथर्व कोटगी यांचा समावेश होता. यावेळी माजी नगराध्यक्षा सुनिता लाटकर -होणकांबळे, श्रीमंत दादाराजे देसाई सरकार, आकाश भिसुरे, जितेंद्र ऊर्जा, ओंकार घोडके, संजय भिसुरे, सद्दाम बाडीवाले, राजकुमार भिसुरे आदि मान्यवर बालगोविंदांनी कौतुक करत प्रोत्साहन दिले.
Belgaum Varta Belgaum Varta