युवा नेते उत्तम पाटील यांची उपस्थिती : गडहिंग्लजचे पालकर संघ फोडणार दहीहंडी
निपाणी (वार्ता) : येथील चाटे मार्केट व्यापारी मित्र मंडळातर्फे 36 व्या वर्षी बुधवारी (ता.24) सायंकाळी 5 वाजता चाटे मार्केटमध्ये प्रथमच हजाराची दहीहंडी होणार आहे. बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गडहिंग्लज येथील नेताजी पालकर गोविंदा पथकाकडून ही दहीहंडी फोडली जाणार आहे. निपाणी शहरात प्रथमच होणार्या या 51 हजाराची दहीहंडी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होणार आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून निपाणी शहर आणि परिसरातील गोकुळाष्टमी सह दहीहंडीचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला होता. आता संसर्ग कमी झाल्याने बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांच्या सहकार्याने शहरात प्रथमच 51 हजार रुपयाच्या दहीहंडीचे आयोजन केले आहे. यावेळी श्रीमंत विजयराजे देसाई निपाणकर सरकार, श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार, नगरसेवक विलास गाडीवडर, बाळासाहेब देसाई सरकार, संजय सांगावकर, रवींद्र शिंदे सुनील आंबले, रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती चाटे मार्केट व्यापारी मित्र मंडळातर्फे देण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta