महिन्याभरातील धार्मिक कार्यक्रमाची सांगता : महाप्रसादाचे आयोजन
निपाणी (वार्ता) : श्रावण महिना निमित्त येथील महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (ता.24) महाप्रसाद वाटपाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली.
प्रारंभी केली संस्थेचे संचालक प्रवीण बागेवाडी, वज्रकांत सदलगे आणि अनिल पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. प्राणालिंग स्वामी, संजय मोळवाडे, रवींद्र कोठीवाले यांच्या हस्ते महाप्रसाद काहीलीचे पूजन व भाविकांचे हस्ते अभिषेक घालण्यात आला. श्रावण महिन्यात निरंतरपणे नाम जप, यज्ञ, पालखी सोहळा, नित्य पूजेसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. महाप्रसादाने श्रावण महिन्याची सांगता केली.
यावेळी सुनील पाटील, हालशुगर अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, रवींद्र शेट्टी, सुरेश शेट्टी, प्रमोद पणदे, सदानंद चंद्रकुडे, बाबासाहेब चंद्रकुडे, गणेश खडेद, समीर बागेवाडी, महेश बागेवाडी, बाबासाहेब चंद्रकुडे, विजय चंद्रकुडे, इराणा शिरगावे, कल्लाप्पा कुंभार, माजी नगरसेवक रवींद्र चंद्रकुडे, सुलोचना पाटील, वर्षा भोपळे, मंगल भालेभालदार,माधुरी चंद्रकुडे, स्नेहल चंद्रकुडे त्यांच्या यांच्यासह महादेव देवस्थान ट्रस्ट कमिटी, गणेश मंडळ, एस पी ग्रुप, नीलंबिका महिला मंडळ व भावीक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta