निपाणी (वार्ता) : वारकरी संप्रदायातील महान संत शिरोमणी श्री सेना महाराज यांची पुण्यतिथी रोजी येथील साखरवाडी मधील संत सेना भावनात करण्यात आली. त्यानिमित्त विविध कार्यक्रम झाले.
संत सेना महाराज पालखी व भजनी मंडळाच्या मिरवणुकीने पुण्यतिथीची सुरुवात करण्यात आली. पालखी श्री संत सेना भवन ते सटवाई रोड नरवीर तानाजी चौक मध्यवर्ती शिवाजी महाराज चौक येथून शिवाजीनगर दुसरी गल्ली दीपक शिंदे यांच्या घरी नेण्यात आली तेथून संत सेना भवनकडे आणण्यात आली.
यावेळी आरतीसाठी नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडे, सभापती राजू गुंदेशा, शहर भाजपाध्यक्ष प्रणव मानवी, नगरसेवक संतोष सांगावकर, माजी नगरसेवक विजय टवळे, माजी सभापतीनितीन साळुंखे, अशोक राऊत, सुनिता चव्हाण, महेश सूर्यवंशी, बंडा घोरपडे, सुनील राऊत, हेमंत चौगुले, पिंटू बागडे, समाजाचे अध्यक्ष दीपक शिंदे, उपाध्यक्ष विक्रम जाधव, खजिनदार शैलेंद्र चव्हाण, सेक्रेटरी सिद्धार्थ साळुंखे यांच्यासह संचालक व समाज बांधव उपस्थित होते. सिद्धार्थ साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. जयदीप माने यांनी आभार मानले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.