Share
काँग्रेस जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची माहिती : पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम
निपाणी : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निपाणी मतदारसंघातून सहा उमेदवारांची यादी काँग्रेसतर्फे पक्षश्रेष्ठींना माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केपीसीसी अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्याशी दोन वेळा चर्चा करून पक्षश्रेष्ठीकडे पाठविण्यात आली आहेत. त्यामध्ये माजी आमदार काकासाहेब पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, निपाणी भाग काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेश कदम, केपीसीसी समन्वयक सुप्रिया पाटील आणि काँग्रेस युवा नेते रोहन साळवे यांच्या नावाचा समावेश आहे. याबाबत काँग्रेस पक्षाचे हाय कमांड योग्य ते निर्णय घेणार असल्याची माहिती लक्ष्मणराव चिंगळे यांनी मंगळवारी सायंकाळी शासकीय विश्रामधामात आयोजित बैठकीत बोलताना दिली.
चिंगळे म्हणाले, मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची यादी वरिष्ठाची चर्चा करून पक्षश्रेष्ठीकडे पाठवली आहे.
याबाबतची माहिती माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह हाय कमांड कडे पाठवली आहे. इंटेलिजन्स रिपोर्टच्या आधारे वारंवार पाठपुरावा करून चर्चा झाल्यावर उमेदवारी निश्चित होणार आहे. त्यामध्ये माजी आमदार काकासाहेब पाटील यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. सध्या वरिष्ठांमध्ये चर्चेनुसार माजी आमदार काकासाहेब पाटील हेच उमेदवार असावेत, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त झालेला आहे. यापूर्वी काकासाहेब पाटील यांनी बहुजन समाजाला एकत्र आणून सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचे दुरुस्ती दाखविली आहे त्यामुळे मतदार संघाच्या दृष्टीने तेच योग्य उमेदवार आहेत. तेच त्या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार असावेत, अशी ही आपली इच्छा आहे.
काँग्रेस पक्षाच्या निर्णयाशी बांधील राहून यावेळी काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी सर्व नेते मंडळींची आहे. माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे नेतृत्वाखाली व माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील निवडणूक पक्षाच्या उमेदवारांसाठी यशस्वी होण्यासाठी मोर्चेबांधणीसाठी सामूहिकरित्या प्रयत्न होणार आहेत. त्यासाठी सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते व मतदारांनी एकत्र येऊन काँग्रेसचा विजय निश्चित करण्याचे आवाहन चिंगळे यांनी केले.
Post Views:
2,335
Belgaum Varta Belgaum Varta