तहसिलदार कारंडे : बोरगाव नगरपंचायतीला भेट
निपाणी (वार्ता) : बोरगाव नगरपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बोरगाव येथील मूलभूत सुविधांकडे लक्ष देऊन स्वच्छता, शुद्ध पाणी व आरोग्याबाबत जनजागृती करावी. नागरिकांच्या तक्रारी असल्यास तातडीने सोडविण्यास सहकार्य करा, अशा सुचना निपाणीचे तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी केल्या. बोरगाव शहराला भेट देऊन त्यांनी वरील सूचना केल्या.
नगरपंचायत मुख्याधिकारी पी. ए. कल्याणशेट्टी यांनी स्वागत केले. त्यानंतर तहसीलदार कारंडे यांनी बोरगाव नगरपंचायत अधिकारी कर्मचाऱ्यांचा सोबत विशेष सभा घेतली.
तहसीलदार कारंडे म्हणाले, सध्या आधार व मतदान ओळखपत्र लिंक केले जात आहे. या ठिकाणी ५० टक्के हून अधिक लिंक करण्यात आले असून उर्वरित लिंक लवकर करून घ्यावी. त्यासाठी अंगणवाडी शिक्षिका व सहायक यांनी विशेष प्रयत्न करावे. आधार जोडणी लिंकमध्ये निपाणी तालुका जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले आहे. बोरगाव नगरपंचायतीवर प्रशासकीय अधिकार आहे. यासाठी या ठिकाणी सर्वच अधिकाऱ्यांनी लक्ष घालून नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे. अद्याप ५० टक्के करवसुली बाकी असून नागरिकांनी वेळेत मालमत्ता, पाणी कर भरून शहराच्या विकासासाठी सहकार्य करावे.
५० टक्केहून अधिक कर वसुली बाकी आहे. तरी नागरिकांनी घरफाळा व पाणी कर भरून नगरपंचायतीस सहकार्य करावे.
निपाणी शहरानंतर मोठे शहर बोरगांव आहे. या ठिकाणी आरोग्य व स्वच्छता ही दोन्हीही सेवा अविरतपणे सुरू असावी. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे काम सुरळीत व्हावे, यासाठी मुख्याधिकाऱ्यांनीही विशेष लक्ष देऊन आपल्या कर्मचाऱ्यांना करावी करावी. नागरिकांची सूचना हेलपाटे न होता एकाच वेळी त्यांची सर्व कामे व्हावीत, यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. अजून काही व्यापारी व्यापार परवाना काढलेले नाहीत. अशा व्यापाऱ्यांनी व्यापारी परवाने काढून घ्यावेत. बोरगांव नगरपंचायतीमध्ये जन्म व मृत्यू दाखला देण्यात येतो.पण अजूनही काही नागरिकांना माहिती नाही. संबंधितांनी याबाबत जनजागृती करावी, असे आवाहनही तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी केले. यावेळी प्रवीण कारंडे यांनी नगरपंचायतीच्या कामकाजाची पाहणी केली. त्यानंतर कारंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रथम दर्जा सहाय्यक राहुल गुडयिनकर, द्वितीय दर्जा सहाय्यक पोपट कुरळे, महसूल निरीक्षक संदीप वाईंगडे, विजय चौगुला, मुकुंद माळगे, जयपाल नेजे यांच्यासह अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta