Monday , December 8 2025
Breaking News

दीड दिवसाच्या बाप्पांना निपाणीत निरोप

Spread the love
 बाप्पा सोबत सेल्फी
निपाणी (वार्ता) : शहर व ग्रामीण भागात दीड दिवसाच्या गणपती बाप्पांना गुरूवारी (ता. १) सायंकाळी भक्तिमय वातावरणात निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…. घोषणा देत भाविकांनी गणपती बाप्पाचा निरोप घेतला. बुधवारी( ता. ३१) पासून गणेशोत्सवाला थाटात प्रारंभ झाला. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गणरायाच्या आगमनासह दीड दिवसाच्यागणपती विसर्जनाच्या मिरवणुका ढोल ताशे वाजवत. फटाके फोडत वाजतगाजत काढल्या. गुरुवारी (ता.१) भाविकांनी दीड दिवसाच्या गणरायाला निरोप दिला. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून करून गणपती विसर्जन केले.
 निपाणी येथे हवेली, अंमलझरी तलाव, विहिरी, खण अशा विविध ठिकाणी भाविकांनी दीड दिवसाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन केले. ग्रामीण भागातही नदी, विहिरीत दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. शहरातील प्रभाग आणि उपनगर परिसरात गणपती विसर्जनस्थळी निर्माल्य कुंड उभारली आहेत. या कुंडाचा श्रीगणेशमूर्ती विसर्जनावेळी श्रीं’च्या गणेशभक्तांचा उत्साह दुणावला होता. गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी कुणी कुणी बाप्पासोबत छायाचित्र काढले. तर कुणी सेल्फी काढला आणि त्यानंतर गणरायाचा निरोप घेतला. घरातून गणरायाची मूर्ती घेऊन भाविक निघताना गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… एक दोन तीन चार… गणपतीचा जयजयकाराच्या घोषणा दिल्या. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना गणेशभक्तांचा कंठ दाटून आला होता. विशेषत : बालभक्तांच्या चेहऱ्यावर ती जाणीव होती. आज विसर्जन करणाऱ्यांची संख्या अत्यल्प होती.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *