सौंदलगा (वार्ताहर) : येथील सरकारी मराठी मुलांच्या शाळेमधील 178 विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना शाळेकडून एक लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले. येथील सरकारी मराठी मुलांच्या शाळेतील तीन विद्यार्थ्यांच्या पालकांचे कोरोनाच्या काळात निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले होते. अशा घटना घडू नयेत व कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण यामुळे अडचणीत येऊ नये यासाठी एस. डी. एम. सी. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व शिक्षकाकडून विद्यार्थ्यांच्या पालकांचे निधन झाल्यास त्यांना शाळेतून थोडीफार मदत व्हावी व विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे या उदात्त हेतूने शाळेमधील प्रत्येक विद्यार्थ्यावर एक लाख रुपयेचा आरोग्य विमा उतरवण्याची योजना आखून, यासाठी गावातील श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द सहकारी लि. बोरगाव. शाखा सौंदलगा यांचेकडून दहा हजार रुपये, श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट लिमिटेड, निपाणी. शाखा सौंदलगा यांचेकडून तीन हजार रुपये, श्री भैरवनाथ को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मांगुर शाखा सौंदलगा यांचेकडून तीन हजार रुपये, तसेच सामाजिक कार्यकर्ते मारुती भिलुगडे यांच्याकडून दोन हजार रुपये, अशी देणगी जमा करून येथील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर एक लाखाचा आरोग्य विमा कवच देऊन एस. डी. एम. सी. व शिक्षक यांनी नवीन उपक्रम राबवला आहे. यासाठी पालक वर्गातून विद्यार्थ्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta