कुर्ली हायस्कूलमध्ये प्रबोधन कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : तंबाखूजन्य पदार्थाच्या अधीन झालेल्या व्यसनाधीन व्यक्तीचे व्यसन लवकर सुटत नाही. व्यसनमुक्तीसाठी त्याच्या मनाची पक्की तयारी पाहिजे. जनजागृतीच्या माध्यमातूनच तंबाखू सेवन व्यसनमुक्ती होऊ शकते, असे मत बेळगाव येथिल व्यसनमुक्ती केंद्राच्या डॉ. श्वेता पाटील यांनी व्यक्त केले. त्या कुर्ली येथिल सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित तंबाखू सेवन व्यसनमुक्ती प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. एस. पाटील होते.
एस. एस. चौगुले यांनी स्वागत केले.
डॉ. श्वेता पाटील म्हणाल्या, तंबाखू सेवनाने माणसाच्या शरीर व आरोग्यावर विविध अनिष्ट परिणाम होतात. तंबाखू सेवनामुळे कॅन्सर, हृदयरोग, लकवा, रक्तदाब, वांझपणा आदी भयंकर रोग होतात. प्रसंगी तंबाखू सेवनाच्या अपायकारक परिणामुळे माणसाला आपला जीव गमवावा लागतो. निकोप समाज निर्मितीसाठी व सुस्वास्थाच्या निर्मितीकरीता माणसाने तंबाखू, गुटखा, खर्रा आदी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन टाळणे गरजेचे सल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांच्या शंकांचे सोदाहरण निरसन केले.तसेच सर्व विद्यार्थ्यांना आरोग्य जनजागृती पत्रकाचे वितरण करण्यात आले. यावेळी एम. व्ही. राजन, सौंदलगा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका एस. व्ही. नदाफ, एस. एस. अंकलगी, भारती गुरव, सुनिता बुधाळे यांच्यासह विद्यालयाचा सेवक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. एस. एस. साळवी यांनी सूत्रसंचालन केले. यु. पी पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta