
निपाणी (वार्ता) : महादेव गल्ली येथील श्री गणेश मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ११ फुटी श्री फळांचा गणपती उभारण्यात आला आहे. या मूर्तीची गुरुवारी (ता.१) निडसोशी मठाचे शिवलिंगेश्वर महास्वामी यांच्या हस्ते श्री मूर्तीची पूजा करण्यात आली. यावेळी महाआरती झाली. यावेळी शिवलिंगेश्वर महास्वामी म्हणाले, पूर्वी गणेश उत्सव हा सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा केला जात होता. अलीकडच्या काळात रोषणाई आणि सजावटीला महत्त्व आले आहे. निपाणी शहरात ५१ वर्षे गणेश उत्सव साजरा करणाऱ्या श्री गणेश मंडळाचे कार्य स्तुत्य असल्याचे सांगितले. स्वागत मंडळाचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी केले.
कार्यक्रमास माजी आमदार काकासाहेब पाटील, बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील, श्रीमंत दादाराजे निपाणीकर सरकार, नगरसेवक संजय सागावकार, संजय मोळवाडे, बाबासाहेब चंद्रकुडे, दयानंद कोठीवाले, रविंद्र कोठीवाले, मल्लिकार्जुन गडकरी, अमर बागेवांडी, महेश बागेवाडी, समीर बागेबांडी, डॉ. महेश ऐनापुरे, रवी चंद्रकुडे, सदानंद चंद्रकुडे, शीवकांत चंद्रकुडे, सुनील पाटील-आडीकर, अण्णासाहेब जाधव, रवींद्र शेट्टी, विक्रम देसाई, बाबुराव भोपळे, आप्पासाहेब आडीपोवाडे, अनिल नेस्टी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मंडळातर्फे मंगळवारी (ता. ६) सायंकाळी हळदीकुंकू समारंभ व महाआरती होणार आहे. बुधवारी (ता. ७) श्री गणेश याग यज्ञ व महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta