कोगनोळी, ता. 2 : येथील पीरमाळ येथे असणाऱ्या पीटीएम तरुण मंडळांनी आपली गणेश मूर्ती ट्रकमध्येच प्रतिष्ठापना करून एक वेगळेपण जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.
पीटीएम तरुण मंडळ प्रतिवर्षी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांची जोपासना करत आहे. चालू वर्षीही या ठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या ठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना संतोष पाटील यांनी आपल्या ट्रक मध्ये केली आहे. आठ-दहा दिवस ट्रक इतर वाहतुकीसाठी बंद करून त्यांनी खास गणपतीसाठी उभा केला आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
रोज सकाळी आठ वाजता व संध्याकाळी आठ वाजता विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होऊन मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात येत आहे. या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमासह विविध मनोरंजनाचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी अध्यक्ष अक्षय वरुटे, खजिनदार राहुल वरुटे, राजाराम वरुटे, बाबासाहेब निकम, संजय जाधव, दिलीप निकम, रोहित वरुटे, कपिल वरुटे, भीमराव सावळगी, सचिन चिंचणे, अजित पाटील, महावीर चिंचणे, संतोष करवसे, सचिन चौगुले, चंद्रकांत पोवाडे, अजित नाईक, शिवाजी नाईक, प्रकाश निकम यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta