पोलीस उपाधीक्षक बसवराज एलिगार : मंडळातर्फे सत्कार समारंभ
निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात गणेशोत्सव मंडळांची रूपरेषा बदलत चालली आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सवाचा मूळ उद्देशच बाजूला पडत चालला आहे. अशा परिस्थितीमध्ये येथील महादेव गल्लीतील गणेशोत्सव मंडळातर्फे संस्कृती, परंपरा जपत अनेक समाज उपयोगी उपक्रम राविण्यात येत आहेत. या मंडळाचा आदर्श इतर मंडळांनी घ्यावा, असे आवाहन चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज एलिगार यांनी केले. येथील महादेव गल्लीतील गणेशोत्सव मंडळ शुक्रवारी (ता.२) सायंकाळी त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी माजी नगरसेवक रवींद्र चंद्रकुडे यांनी स्वागत केले. त्यानंतर मंडळाच्या सामाजिक कार्याची माहिती केली गार यांनी जाणून घेतली. त्यानंतर बसवराज एलीगार यांचा माजी सभापती सुनील पाटील यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुमार कुंभार, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंद कॅरकट्टी, व्ही एस एम संस्थेचे संचालक संजय मोळवाडे, बाबासाहेब चंद्रकुडे सोमनाथ चंद्रकुडे, शेखर शांडगे, सागर वालीकर यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta