Sunday , September 8 2024
Breaking News

हावेरी जिल्ह्यातील शिग्गांव येथे श्री अरिहंत सूत प्रकल्प उभारावा!

Spread the love

मुख्यमंत्री बसवराज बोम्माई : बंगळूर येथे विविध विषयावर चर्चा
निपाणी : बोरगाव येथे सहकाररत्न रावसाहेब पाटील (दादा) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या श्री अरिहंत सुत गिरणीचा सुत प्रकल्प हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव येथे उभा करावा. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू, असे ठाम आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिले.
बेंगलोर येथील त्यांच्या निवास्थानी आयोजित वस्त्रोद्योग प्रकल्प बैठकीप्रसंगी चर्चेनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आश्वासन दिले.
सीमाभागातील बोरगाव याठिकाणी मोठा वस्त्रोद्योग प्रकल्प आहे. या धर्तीवरच हावेरी जिल्ह्यातील शिग्गांव येथे ही वस्त्रोद्योग प्रकल्प व्हावा, यासाठी सातत्याने मुख्यमंत्री बसवराज बोम्माई प्रयत्न करीत आहेत. या अनुषंगाने सर्व विभागातील अधिकारी व तज्ञांशी चर्चा व बैठक बोलविण्यात आले होते. यासाठी विशेष आमंत्रण म्हणून युवानेते उत्तम पाटील, अभिनंदन पाटील, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
कर्नाटक शासनाकडून वस्त्रोद्योगाला उर्जितअवस्था देण्याबरोबरच विविध शासकीय योजनाही राबविण्यात येत आहेत. वस्त्रोद्योग क्षेत्रात राज्याचे नाव लौकिक व्हावे यासाठी आपण शिग्गांव येथे वस्त्रोद्योग पार्क उभा करीत आहोत. पण यासाठी लागणारे प्राथमिक माहिती अधिकार्‍यांकडून व तज्ज्ञांकडून मिळते. बोरगाव येथेही वस्त्रोद्योग पार्क आहे. शिवाय जवळच मॅचेस्टर नगरी इचलरकंजी आहे याठिकाणी मोठा वस्त्रोद्योग व्यवसाय आहे या अनुषंगाने आपण इचलकरंजी व बोरगाव येथील वस्त्रोद्योग व्यवसायिकांची चर्चाकडून त्याच्या निगडित असलेल्या सर्व घटकांची माहिती घेण्यासाठी आपण ही बैठक बोलण्यात आली आहे. सीमाभागात बोरगाव येथील श्री अरिहंत सूतगिरणी मोठा प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे चालवला आहे. हा प्रकल्प शीग्गांव येथेही उभारावा. यासाठी लागणारे सर्व शासकीय सहकार्य आपण करण्यास कटिबद्ध आहोत, असेही शेवटी मुख्यमंत्री बोम्माई यांनी सांगितले.
अरिहंत उद्योग समूहाकडून सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातीलही कामगिरी पाहून त्यांनी विशेष अभिनंदन केले. सामाजिक कार्याला आपले नेहमीच साथ राहील असेही सांगितले. बैठकीप्रसंगी अरिहंत सूतगिरणीचे चेअरमन उत्तम पाटील, महाराष्ट्र राज्याचे माजी वस्त्रोद्योग मंत्री आमदार प्रकाश आवाडे, उद्योगपती अभिनंदन पाटील, जिल्हा पंचायत सदस्य राहुल आवाडे, सूतगिरणीचे संचालक दिलीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कार्वेकर, आर. टी. चौगुला, प्रद्युमन कडोले, नागेश भंडारी, अमित हनुमानवर यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी व तज्ज्ञ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *