हंचिनाळ (वार्ताहर) : श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द सहकारी पतसंस्थेच्या हंचिनाळ (ता. निपाणी) शाखेचा शुभारंभ श्री दत्त आडी देवस्थानचे परमपूज्य परमात्माराज राजीवजी महाराज व हंचिनाळ येथील भक्ती योगाश्रम मठाचे मठाधिपती परमपूज्य महेशानंद स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यामध्ये उत्साहात संपन्न झाला.
प्रारंभी संस्थेचे संस्थापक व कोगनोळी ग्रामपंचायत सदस्य, युवा नेते श्री. सचिन खोत व व्हा. चेअरमन महादेव मिरजे यांनी सर्वांचे स्वागत केले.
त्यानंतर राजीवजी महाराज यांच्या हस्ते फित सोडून उद्घाटन करण्यात आले. तर महेशानंद स्वामीजी यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी दीपप्रज्वलन श्रीदत्तगुरु यांच्या प्रतिमेचे पूजन, संगणक, धनपेटी यांचे पूजन उपस्थित मुख्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
राजीवजी महाराज आणि महेशानंद स्वामीजी यांची पाद्यपूजा सिद्धगोंडा खोत आणि विदुला हेगडे यांनी केले. प्रमुख मान्यवरांचा सत्कार संस्थेचे यावेळी कागल येथील ज्येष्ठ साहित्यिक जनार्दन पाखरे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सचिन खोत यांनी अगदी कमी वयात खुप मोठे काम केले असून त्यांनी सुमारे 35 लोकांचे आपल्या संस्थेच्या माध्यमातून संसार उभे केले आहेत. भविष्यात मोठ्या पदावर जाण्याची त्यांच्यात क्षमता आहे, असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी परमाब्धिः ग्रंथाचे वितरण करण्यात आले. यावेळी आडी हंचिनाळ ग्रामपंचायतचे चेअरमन बबन, सदस्य एम. वाय. हवालदार, ब्रम्हनाथ मल्टीपर्पजचे चेअरमन विजय कुरणे, अनिल कुरणे, अनिल पिकेपीएस चेअरमन अरुण चौगुले, अजित पाटील, कामधेनु रोपवाटिकेचे मालक अनिल कोंडेकर, श्री. एस. आर. पाटील. अरुण पाटील, दिनकर कोंडेकर, दत्ता पोवार एन. डी. वंदुरे, निशांत वंदुरे, आर. एल. चौगुले, मधुकर चौगुले. धैर्यशील पाटील, माजी ता.पं.सदस्य बाळासाहेब कागले, मुख्य शाखाधिकारी सागर बाळीकाई, जगन्नाथ खोत यांच्यासह कोगनोळी व हंचिनाळ गावातील विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, दत्तगुरु संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विठ्ठल खोत यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta